सखी मंच सदस्यांसाठी सरीवर सरी कार्यक्रम
By Admin | Updated: July 13, 2014 00:20 IST2014-07-12T23:49:29+5:302014-07-13T00:20:03+5:30
जालना : लोकमत सखी मंच व सेवाराम प्रभुदास सिंधी सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १३ जुलै रोजी सरीवर सरी हा हिंदी मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सखी मंच सदस्यांसाठी सरीवर सरी कार्यक्रम
जालना : लोकमत सखी मंच व सेवाराम प्रभुदास सिंधी सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १३ जुलै रोजी सरीवर सरी हा हिंदी मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा खास कार्यक्रमांसाठी लोकमत सखीमंच सदस्यांसाठीच खुला आहे.
येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सायं. ५ ते ७ दरम्यान हा कार्यक्रम होणार असून, प्रसिद्ध गायिका अनघा काळे या हिंदी व मराठी गीते सादर करणर आहेत. या कार्यक्रमात स्थानिक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यावेळी गायिका अनघा काळे, गौरव पवार, रवींद्र खोमणे, विनोद वावळ, जितेंद्र साळवी, राजेश जगदान व अभय यांचा संच बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे. तरी सखी मंच सदस्यांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ९६६५१०११३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)