‘परिवहन’चा महसूल गोळा करण्यावरच भर

By Admin | Updated: May 31, 2014 01:24 IST2014-05-31T01:12:27+5:302014-05-31T01:24:27+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणार्‍या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कामांसाठी येणार्‍या वाहनचालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

Enhanced revenue collection of 'transport' | ‘परिवहन’चा महसूल गोळा करण्यावरच भर

‘परिवहन’चा महसूल गोळा करण्यावरच भर

संतोष हिरेमठ, औरंगाबाद कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणार्‍या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कामांसाठी येणार्‍या वाहनचालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी अशा आवश्यक सुविधाही तेथे उपलब्ध नाहीत. कामासाठी वारंवार चकरा मारणे, उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांमुळे ताटकळत उभे राहणे हे तर नेहमीचेच झाले आहे. हे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयास २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी १२१ कोटी ८१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १२० कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल वसूल झाला. गेल्या आर्थिक वर्षात वाहन नोंदणी, चॉईस नंबर, पर्यावरण कर, दंडात्मक कारवाई आदींमधून ही वसुली झाली. दिलेले उद्दिष्ट १०० टक्क्यांपर्यंत गाठले गेले. सोयी-सुविधांचा अभाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या वाहनचालकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनांची पार्किंग या गैरसोयींना तोंड द्यावे लागते. शेडअभावी लर्निंग लायसन्स, कायम लायसन्स काढण्यासाठी येणार्‍या वाहनचालकांना भरउन्हात उभे राहावे लागते. पावसाळ्यात वाहनचालकांची मोठी अडचण होते.कर्मचार्‍यांची अपुरी संख्या आरटीओ कार्यालयाचे कामक ाज केवळ ३८ कर्मचार्‍यांवर चालत आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांच्या संख्येमुळे वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागते. काही तासांच्या कामासाठी वारंवार खेट्या माराव्या लागतात. जास्त पैसे मोजण्याची वेळ आरटीओ कार्यालयातील असुविधांमुळे वाहनचालकांवर वारंवार चकरा मारण्याची वेळ येत आहे. त्यामुळे नाइलाजाने अनेक वाहनचालक एजंटांकडून काम करून घेण्यास प्राधान्य देतात. त्यांना जास्त पैसे मोजण्याची वेळ त्यांच्यावर येते. आरटीओ कार्यालयात चकरा मारण्यापेक्षा जास्त पैसे मोजलेले बरे असा त्यांचा विचार असतो.कार्यालयाची जागा अपुरी शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे रोज कामानिमित्त कार्यालयात येणार्‍या वाहनांची संख्याही वाढली आहे. ही वाहने कुठे उभी करायची? असा प्रश्न निर्माण होतो. जप्त केलेली वाहने उभी करण्यास जागा नाही. जेथे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जात होती त्या ट्रॅकवरच अवजड वाहने उभी केली जात आहेत.जागेच्या समस्येला प्राधान्य प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुविधा असल्या तरी त्या आजच्या गरजा भागवू शकत नाहीत. कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने जागेचा प्रश्न मिटविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीत आहोत. कर्मचार्‍यांच्या रिक्त जागांबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. -गोविंदराव सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारीहार्ड सरफेसचा पर्यायी रस्ता जड वाहनांची पासिंग आणि हार्ड सरफेसवर ब्रेक तपासणीचे काम शेंद्रा परिसरात सुरू करण्यात आले; परंतु औरंगाबादपासून शेंद्रा दूर आहे. त्यामुळे शहराजवळ अथवा वाळूज परिसरात हार्ड सरफेसचा पर्यायी रस्ता करण्याची गरज आहे. आरटीओ कार्यालयातील अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे अनेकदा वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्यामुळेही गैरसोय होते. -फय्याज खान, अध्यक्ष, गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन असुविधाच अधिक कोट्यवधी रुपये महसुलापोटी गोळा करणार्‍या आरटीओ कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव दिसतो. कर्मचारी कार्यालयाच्या वेळा पाळत नाहीत. त्यामुळे वारंवार चकरा माराव्या लागतात. मोफत अर्ज मिळण्याची आवश्यकता असताना त्यासाठी झेरॉक्स दुकानात पैसे मोजावे लागतात. रिक्षाचालकांनाही अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. -एस.के. खलील, कार्याध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समिती

Web Title: Enhanced revenue collection of 'transport'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.