कम्युनिटी पोलिसिंगतर्फे गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:21+5:302020-12-29T04:05:21+5:30
कोरोनामुळे इंग्रजी शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. परंतु सरकारी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ...

कम्युनिटी पोलिसिंगतर्फे गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे
कोरोनामुळे इंग्रजी शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. परंतु सरकारी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होता येत नाही. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन एस. पी. जवळकर आणि एपीआय घनश्याम सोनवणे यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने या वर्गाची सुरूवात केली. एस. पी. जवळकर यांनीही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश व इंग्रजी व्याकरण हे विषय शिकविले.
पोलिसांनीच मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. कामानिमित्त केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यात गेलो असता, तेथील अधिकारी इंग्रजीत बोलायचे आणि मला मात्र हिंदीतून बोलावे लागायचे. आपल्या भागातील मुलांना असा अनुभव येऊ नये, म्हणून कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले, असे सोनवणे यांनी नमूद केले. नुमान खान व मदन गुसिंगे यांचीही यावेळी उपस्थिती होती.