शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

न्यू हनुमाननगरात अभियंत्याचे घर फोडून ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:31 IST

पावणेपाच तोळ्यांच्या दागिन्यांसह ५० हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली

ठळक मुद्देघरी कोणी नसल्याची चोरट्यांनी साधली संधी

औरंगाबाद : सिडको एन-४ परिसरालगतच्या न्यू हनुमाननगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी पावणेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये पळविल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल करण्यात आली.

महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता सुरेश दगडूजी माने हे न्यू हनुमाननगर येथे सहकुटुंब राहतात. माने हे सोयगाव येथे कार्यरत आहेत. त्यांची पत्नी माहेरी गेल्याने ३ डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून सोयगाव येथे गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे ४ ग्रॅमचे मनीमंगळसूत्र, ५ ग्रॅमचे मनी आणि पेडल, पाच ग्रॅमची ठुशी, ७ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, ३ ग्रॅमचे गळ्यातील लटकन, ५ ग्रॅमची सोनसाखळी, १ ग्रॅमची नथ, सुमारे १७ ग्रॅमचे सोन्याचे चेन, दोन कडे, वाळे, तीन नाणी आणि रोख ५० हजार रुपये चोरून नेले. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता माने यांची पत्नी माहेराहून परतली तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. 

या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पतीला कळविली. रात्री माने हे घरी परतले आणि त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती कळविली. माने यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉलमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दगिन्यांसह आणि ५० हजाराची रोकड पळविल्याचे त्यांना आढळून आले.  पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, डी.बी. पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.  याविषयी   पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरीPoliceपोलिस