आदर्श गाव पाटोद्यात भास्कर पेरे पर्वाचा अस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 05:00 IST2021-02-09T04:59:14+5:302021-02-09T05:00:03+5:30
सोमवारी झालेल्या विशेष सभेत सरपंचपदी जयश्री दिवेकर, तर उपसरपंचपदी कपिंद्र पा. पेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

आदर्श गाव पाटोद्यात भास्कर पेरे पर्वाचा अस्त
वाळूज महानगर (जि. औरंगाबाद) : राज्याचे रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, माजी सरपंच भास्कर पेरे पर्वाचा अस्त झाला आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेत सरपंचपदी जयश्री दिवेकर, तर उपसरपंचपदी कपिंद्र पा. पेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
अडीच दशकांपासून आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीवर माजी सरपंच भास्कर पा. पेरे यांचे एकहाती वर्चस्व होते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर पा. पेरे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला होता.