जि.प.च्या जागांवरील अतिक्रमण हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:29 IST2017-09-28T00:29:44+5:302017-09-28T00:29:44+5:30
जिल्ह्यात जि.प.च्या अनेक मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांची देखरेख नसल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यात काही ठिकाणची अतिक्रमणे काढण्यास तर न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अशा विविध ठिकाणच्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची मोहीम आखली जात आहे.

जि.प.च्या जागांवरील अतिक्रमण हटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या अनेक मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांची देखरेख नसल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यात काही ठिकाणची अतिक्रमणे काढण्यास तर न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अशा विविध ठिकाणच्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची मोहीम आखली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जि.प.च्या मालमत्ता आहेत. मोठी व मोक्याच्या ठिकाणची जागा असून अशा ठिकाणी उत्पन्नाच्या स्त्रोत वाढविणाºया वास्तू उभे करणे जि.प.ला शक्य झाले नाही. त्यादृष्टिने प्रयत्नही करण्यात आले नसल्याने काही ठिकाणी मात्र या जागांचा फायदा खाजगी अतिक्रमणधारक घेत आहेत. यात अनेक ठिकाणी कच्ची अतिक्रमणे असल्याने जि.प.कडून अधून-मधून ती हटविली जातात. मात्र काहींनी मुजोरी करीत पक्की बांधकामे करून राजरोसपणे तेथे व्यवसाय थाटले आहेत. अशा बांधकामांना जि.प.च्या अधिकाºयांकडून अथवा पंचायत समित्यांकडून साधी नोटीसही दिली जात नाही. त्यामुळे यातील अनेकांना तर आपणच या जागेचे मालक असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांना आता अचानक मोहिमेच्या बडग्यात जागा सोडाव्या लागतील, अशी चिन्हे आहेत. जि.प.त अधिकाºयांकडून तशा पद्धतीने नियोजन केले जात आहे.