अतिक्रमण काढल्याने सिल्लोडकरांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:50 IST2017-09-09T00:50:53+5:302017-09-09T00:50:53+5:30
सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील अण्णाभाऊ चौक ते महावीर चौकापर्यंत असलेल्या एकतर्फी दुकानांचे नाल्यावरील अतिक्रमण शुक्रवारी नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने काढले

अतिक्रमण काढल्याने सिल्लोडकरांची धांदल
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील अण्णाभाऊ चौक ते महावीर चौकापर्यंत असलेल्या एकतर्फी दुकानांचे नाल्यावरील अतिक्रमण शुक्रवारी नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने काढले. अचानक केलेल्या या कारवाईमुळे दुकानदारांची एकच धांदल
उडाली.
सिल्लोड येथील महेश शंकर पल्ली यांनी दुकानासमोरील नालीवरचे अतिक्रमण हटविण्यासाठी मागील महिन्यात उपोषण केले होते. यानंतर जिल्हाधिकाºयांनी सिल्लोड न. प.ला अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिले होते. सदरील कारवाई सुरु होताच या भागातील एकतर्फी दुकाने पूर्ण बंद करण्यात आले.
या कारवाईमुळे दुकानासमोरील अतिक्रमण केलेले साहित्य मुख्य रस्त्यावर पडले होते.
अतिक्रमण काढणे सुरु असताना दुभाजकापैकी एकाच रस्त्याने पोलिसांनी वाहतूक व्यवस्था केली होती. या कारवाईमुळे दुकानदारांवर आर्थिक संकट ओढवले
आहे.
शहरातील बसस्थानक परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भगवान महावीर चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. दुकानदारांनी नाल्यांवर ढापे टाकून ठेवल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी नाल्यात जात
नव्हते.
या प्रकरणी वेळोवेळी सूचना देऊनही दुकानचालकांनी सदरील अतिक्रमण व नाल्यांवरील ढापे काढले नसल्याने शुक्रवारी अखेर नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली, असे मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी सांगितले.