कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:04 IST2021-04-05T04:04:47+5:302021-04-05T04:04:47+5:30
ग्रामीण भागात आज घडीला लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे शहर व इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच शासकीय ...

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
ग्रामीण भागात आज घडीला लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे शहर व इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच शासकीय कर्मचारी दररोज शहरातून ग्रामीण भागात ये-जा करत असल्याने खेड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेथे नोकरीला आहे, तेथेच राहणे सक्तीचे करा, अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा निधोना येथील नागरिकांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर शंभरहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बाबरा आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ११४ रुग्ण
फुलंब्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा अंतर्गत येणाऱ्या दहा गावामध्ये ११४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून २८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यात बाबरा-६५, बोधेगाव खु.-०४, नायगाव-०२, चिंचोली (न)-०६, निधोना-०५, सोनारी-०८, लिहा (ज)-१७, आडगाव बु.-०१, बाभुळगाव-०५, बोधेगाव बु-०१ अशी संख्या असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य केंद्रामार्फत रविवारपर्यंत ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५०१ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे.