शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट

By बापू सोळुंके | Published: May 09, 2024 12:47 PM

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) पाच वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाणी बचतीला प्राधान्य देणाऱ्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९२ हजार ५८३ असल्याचे दिसून येते. यासाठी शेतकऱ्यांना तब्बल ६२२ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान शासनाने दिल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला. पोकरा योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. बहुतेक योजनेमध्ये ७५ ते ८० टक्के अनुदान शासनाने दिले होते. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी ‘पोकरा’तील योजनांचा लाभ घेतला. सतत पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वाधिक ७४ हजार ३५० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेतल्याचे दिसून येते. पाणी बचत करणाऱ्या या यंत्रणांचा लाभ घेणाऱ्या ठिबकच्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने ५५८ कोटी ९४ लाख ९८ हजार २७० रुपये तर तुषार सिंचन योजनेेचा तब्बल १८ हजार २३३ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. तुषार सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना ३३ कोटी ५६ लाख ९८० रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

८० टक्के अनुदानावर शेती उपयोगी यंत्रणापोकरामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सेट पुरविणे, गांडूळखत निर्मिती सेट देणे, पोल्ट्री उद्योगास साहाय्य, शेती यांत्रिकीकरण, वैयक्तिक शेततळे योजना, शून्य मशागत शेती प्रोत्साहन योजना, फळबाग योजना, मधुमक्षिकापालन, शेडनेट हाऊस, तुषार सिंचन सेट, फवारणी यंत्र, वैयक्तिक विहीर, शेततळे अस्तरीकरण योजना, पाइपलाइन, विहीर पुनर्भरण योजना, पॉलिहाऊस योजना, रेशीम शेती, मत्स्यपालन, मोटारपंप इ.चा यात समावेश होता.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले ९८७ कोटी ३३ लाख रुपये अनुदानपोकराच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांना सुमारे ९८७ कोटी ३३ लाख ३ हजार ८१० रुपये अनुदान मागील पाच वर्षात प्राप्त झाले. यात सर्वाधिक लाभार्थी ठिबक सिंचनचे तर फळबाग लागवडीसाठी १५ हजार ८५५ शेतकऱ्यांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार ८७१ रुपयांचे अनुदान मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र