शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

टँकरमधून गॅस गळतीनंतर सिडको उड्डाणपूल परिसरात इर्मजन्सी; घरे, दुकाने रिकामे केली

By सुमेध उघडे | Published: February 01, 2024 12:05 PM

पोलिसांकडून परिसरात गॅस न पेटवण्यासाठी अनाउन्समेंट करण्यात आली आहे

छत्रपती संभाजीनगर: आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील उड्डाणपुलास धडकल्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे. सहा तासांपासून येथे आपतकालीन परिस्थिती आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी  वाहतूक बंद केली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ५ किलोमीटर परिसरातील वीज पुरवठा बंद केला असून नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. उड्डाणपरिसरातील कॅनॉट प्लेस, हायकोर्ट जवळील आस्थापना देखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल नेटवर्क ही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

१७. ५ मेट्रिक टन गॅस टँकरमध्ये शहरातील सिडको उड्डाणपुलाजवळ एचपी कंपनीच्या गॅस टँकरला पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून, या ठिकाणी टँकरने गॅसचा पुरवठा केला जातो. पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास साडे सतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात असताना सिडको उड्डाणपूल सुरू झाल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उड्डाणपुलाच्या भिंतीवर चढला. 

आतापर्यंत ७० टँकरचा मारासदर घटनेची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी व पोलीस अवघ्या पाच -दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चारही बाजूने रस्ता बंद केला. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत असल्यामुळे परिसरातील लाईट बंद करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला जात आहे. आत्तापर्यंत ७० टँकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे. संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली असून, चार तासांसाठी तीन उपकेंद्रांवरील वीजही बंद करण्यात आली आहे. 

वाहतूक ठप्प शहरातील मुख्य जालना रोडवरील वाहतूक मुकुंदवाडी आणि सेव्हन हिल उड्डाणपूलापासून दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे.इतर मार्गे वाहतूक वळविण्यात आल्याने गजानन मंदिर रोड, पुंडलीक नगर, मुकुंदवाडी, प्रोझोन मॉल रोड, सिडको बसस्टँडजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहेत.

नागरिकांना आवाहनया परिसरात कोणीही जाऊ नये, वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.

मनपा अधिकारी, महसूल, पोलीस अधिकारी घटनास्थळीधोकादायक परिस्थितीची शक्यता असल्याने महापालिका, महसूल आणि पोलिस विभागातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी उड्डाणपूल परिसरात दाखल झाले आहेत. गॅस गळतीचा आढावा घेऊन अधिकारी यंत्रांना सूचना करत आहेत. प्रशासनाने परिसरातील सर्व महाविद्यालय, शाळा बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कॅनॉट प्लेस, सेंट्रल नाका, एपीआय कॉर्नर पर्यंत आस्थापना, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, परिस्थिती सुरळीत होण्यासाठी आणखी पाच ते सहा तास लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात