कठोर निर्बंधांमधील विसंगती दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:31+5:302021-04-10T04:04:31+5:30
औरंगाबाद : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथील करावेत, अशी मागणी आ. ...

कठोर निर्बंधांमधील विसंगती दूर करा
औरंगाबाद : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथील करावेत, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी म्हटले आहे की, ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत किराणा, मेडिकल अशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ५ ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात व्यापारी व सर्वसामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. नव्या निर्बंधात लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लग्नासाठी आवश्यक असणारे नवीन कपडे, दागिने, भांडी व इतर साहित्यांची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे लग्नासाठी खरेदी करायची कशी? असा प्रश्न वधू-वर पक्षासमोर उभा राहिला आहे. तसेच उद्योग कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, कंपन्यांतील उत्पादने विक्री करणारी दुकाने आणि शो रूम बंद ठेवण्यात आली आहे. बांधकांमांना परवानगी आहे. परंतु बांधकामासाठी लागणारी साहित्यांची दुकाने मात्र उघडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बांधकाम करायचे कसे? असे अनेक बाबतीत झाले आहे.