मोठा अपघात टळला! देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अडकली विद्युतीकरणची केबल, रेल्वे खोळंबल्या
By संतोष हिरेमठ | Updated: December 13, 2022 05:20 IST2022-12-13T05:17:54+5:302022-12-13T05:20:46+5:30
रात्री दीड वाजेपर्यंत देवगिरी एक्स्प्रेस दौलताबाद येथे उभी होती.

मोठा अपघात टळला! देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अडकली विद्युतीकरणची केबल, रेल्वे खोळंबल्या
औरंगाबाद : मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विद्युतीकरणची केबल अडकल्याची घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास दौलताबादजवळ घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घना घडली नसल्याचे समजते. मात्र, या घटनेमुळे रेल्वे खोळंबल्या. विद्युतीकरणची केबल चोरी करण्यातून हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटनेमुळे रात्री दीड वाजेपर्यंत देवगिरी एक्स्प्रेस दौलताबाद येथे उभी होती. तर मुंबईहुन औरंगाबादला येणारी नंदिग्राम एक्स्प्रेसही दौलताबाद येथे एक तासापासून उभी होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.