आईसकँडी फॅक्टरीत वीजचोरी
By Admin | Updated: June 21, 2017 00:09 IST2017-06-21T00:08:34+5:302017-06-21T00:09:46+5:30
औरंगाबाद : शहरातील सिटीचौक परिसरात गुड्डी ही आइसकँडीची (कुल्फी) फॅक्टरी चोरीच्या विजेवर उत्पादन करीत असल्याचे महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने उघडकीस आणले.

आईसकँडी फॅक्टरीत वीजचोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील सिटीचौक परिसरात गुड्डी ही आइसकँडीची (कुल्फी) फॅक्टरी चोरीच्या विजेवर उत्पादन करीत असल्याचे महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने उघडकीस आणले. कंपनीला या गारेगार उद्योगाने ७ लाख ३३ हजार ७५० रुपयांच्या विजेचा झटका दिला आहे.
महावितरणच्या भरारी पथकाने कुल्फी कारखान्यावर धाड टाकली. या प्रकारात दंडासह ७,३३,७५० रुपयांची वीजचोरी पकडली. या प्रकरणात कंपनीच्या तक्रारीवरून जालना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीने कळविले आहे की, सिटीचौक परिसरात कुल्फी कारखाना वीजचोरीवर सुरू असल्याची माहिती महावितरणला मिळाली. त्यावरून मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेली, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनत, सहायक अभियंता भूषण जाधव, राजेश गिरी, लिपिक वैभवी भालेराव व तंत्रज्ञांनी गुड्डी कुल्फी कारखान्यावर सोमवारी धाड टाकली. यात एक थ्री फेज मीटर असताना आकडा टाकून विजेचा वापर करत असल्याचे आढळून आले. वीज मीटरचा पंचनामा करून ते ताब्यात घेण्यात आले. तपासणीत ३५,३९९ युनिटचा विजेचा वापर करून ५,६७,२९० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.
या वीजचोरीप्रकरणी कारखान्याचे मालक मिर्झा मोहम्मद साजेद, मिर्झा मोहम्मद फरोग यांच्या विरोधात वीज कायद्यानुसार जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.