विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: November 8, 2016 00:01 IST2016-11-08T00:04:32+5:302016-11-08T00:01:49+5:30
परंडा : विद्युत डीपीमध्ये झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला.

विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू
परंडा : विद्युत डीपीमध्ये झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी तालुक्यातील डोमगाव शिवारात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परंडा तालुक्यातील डोमगाव शिवारातील किरण कोकाटे यांच्या शेतातील माळेवस्तीमधील विद्युत डीपीमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या डीपीवरील विद्युतजोडणी असलेल्या काही शेतकऱ्यांनी सोनारी येथील खाजगी लाईनमन जोतीराम नवनाथ यादव यांना दुरूस्तीसाठी बोलाविले होते. सोमवारी सकाळी यादव हे दुरूस्तीचे काम करण्यासाठी डीपीच्या पोलवर चढले. मात्र, यावेळी विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे त्यांना विजेचा जबर धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत जोतीराम यादव यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सोनारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)