शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:33 IST

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत.

ठळक मुद्देदररोज होतो वीजपुरवठा खंडित : उद्योजक त्रस्त, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार सुरू

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. तसे झाले तर औरंगाबादेत औद्योगिकीकरणाची सुरुवात करणारे पहिले औद्योगिक क्षेत्र नामशेष होण्याची चिंता ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.उद्योगांना वीजपुरवठा ही सर्वात महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योगांना महावितरणकडून ही सुविधा पुरविली जाते. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात मुख्यत: रेडियंट अ‍ॅग्रो, इंडस्ट्रियल १ व २, एलोरा या फिडरवरील वीजपुरवठा गेल्या दोन वर्षांपासून दररोज तासन्तास खंडित होत आहे. हे फिडर खंडित वीजपुरवठ्यासाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. या फिडर्सवरील ट्रान्सफॉमर्स, केबल्स, वीजवाहिन्या या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होतात आणि वीजपुरवठा बंद होतो. यातून या फिडरवर जोडलेले उद्योग दररोज किमान २ ते ३ तास बंद पडतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होते. यंत्रसामग्रीचेही नुकसान होते. या सगळ्या परिस्थितीत कामगारांचे वेतन मात्र, द्यावेच लागते. त्यामुळे उद्योगांना दोन्ही बाजंूनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे येथील उद्योग इतरत्र हलविण्याचा विचारही उद्योजक करीत आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येक डे गांभीर्याने लक्ष द्यावे. भविष्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि येथील उद्योगांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे, माजी अध्यक्ष किशोर राठी, पदाधिकारी अभय हंचनाळ, मनीष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी, भगवान राऊ त, विक्रम डेकाटे, कुंदन रेड्डी आदींनी केले आहे.वीजपुरवठ्यानुसार कामाचे नियोजनचिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मसिआ’ संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक वेळी अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळते; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, वीज खंडित होईल, हे गृहीत धरूनच दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे लागत आहे. त्यातून अपेक्षित उत्पादन होत नाही. पायाभूत सुविधांअभावी चिक लठाणा औद्योगिक वसाहतीची वाताहत होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण