पंचायत समिती गणासाठी पोटनिवडणूक जाहीर
By Admin | Updated: December 20, 2015 23:37 IST2015-12-20T23:31:03+5:302015-12-20T23:37:04+5:30
परभणी : मानवत तालुक्यातील रामपुरी येथील पंचायत समिती गणाची जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.

पंचायत समिती गणासाठी पोटनिवडणूक जाहीर
परभणी : मानवत तालुक्यातील रामपुरी येथील पंचायत समिती गणाची जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.
महाराष्ट्र पंचायत समिती नियम १९६२ मधील नियम १३ पोटनियम १ (अ) अन्वये जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला. रामपुरी बु. येथील नागरिकांचा मागासप्रवर्गाची जागा रिक्त झालेली आहे. या जागेसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची अखेरची तारीख २८ डिसेंबर आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. मानवत येथील तहसीलदारांच्या दालनात ही छाननी होणार आहे. त्यानंतर आवश्यकता असल्यास १० जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सकाळी ७.३० ते ५.३० असा मतदानाची वेळ आहे. ११ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
मानवत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीचे ठिकाण निश्चित केले आहे. मानवत पंचायत समितीच्या रामपुरी बु. गणाची जागा रिक्त झाल्याने जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)