शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

By विकास राऊत | Updated: May 17, 2024 14:02 IST

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीचा धुराळा खाली बसला आहे. निवडणूक यंत्रणेत प्रशासकीय यंत्रणा आणि उमेदवारांच्या प्रचारात राजकीय नेते गुंतल्यामुळे विभागातील दुष्काळाकडे कुणीही पाहिले नाही. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात लावल्यामुळे सुमारे १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर भागत आहे. रणधुमाळी संपली असून, आता शासन आणि प्रशासनाने टंचाई निवारणासाठी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून पाणीटंचाईचा मध्यंतरी आढावा घेतला होता.

दुष्काळाच्या झळा, पण भाषणे उणीदुणी काढणारीनिवडणूक रणधुमाळीत दुष्काळाचा टक्का वाढला. सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव ही मुद्दे पूर्णत: गायब होते. फक्त उणीदुणी काढणाऱ्या भाषणांमुळेच मतदारांचे मनोरंजन केले.

जलसाठे आटत आहेत...विभागातील जलसाठे आटू लागले. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.

१०९ वरून १७५८ वर गेला आकडा...जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला.

६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले....प्रशासनाने विभागातील २०८३ विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यात ६५१ विहिरींची संख्या वाढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४६, जालना ४६८, परभणी १५८, हिंगोली १००, बीड ३९२, नांदेड १६९, लातूर ३३३, तर धाराशिव जिल्ह्यात ८१३ विहिरींचे अधिग्रहण केले. टँकरसाठी ९००, टँकर व्यतिरिक्त १८३४ अशा २७३४ विहिरींचे अधिग्रहण केले.

जिल्हानिहाय टँकर संख्याछत्रपती संभाजीनगर.......... ६७८जालना.......... ४८८परभणी.............१४हिंगोली ..........०२नांदेड.............. २१ बीड ..............३९९लातूर........... २५धाराशिव........... १३१एकूण ...........१७५८

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबाद