शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजार समित्यांत निवडणूक अटळ

By admin | Updated: November 10, 2014 01:15 IST

जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने

जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह व संचालकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.राज्यात नवे सरकार अरुढ झाले आहे. पाठोपाठ या सरकारने अल्पावधीतच काही धक्कादायक असे निर्णय घेतले आहेत. विशेषत: सहकार क्षेत्रातील संचालकांची मुदत संपलेल्या संस्थांवर प्रशासक नियुक्ती पाठोपाठ व निवडणुकांचा कार्यक्रम लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे लगेचच साद पडसाद उमटू लागले आहेत. गाव पातळीवरील सोसायट्या, तालुकास्थानांच्या खरेदीविक्री संघांसह, बाजार समित्यांत मोठी खळबळ उडाली आहे. या जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील अरुढ पदाधिकाऱ्यांसह संचालक कमालीचे हादरले आहेत. कारण जिल्ह्यातील जालना कृषी उत्पन्नबाजार समितीसह भोकरदन, अंबड येथील बाजार समित्यांवरील संचालक मंडळाची मुदत अनेक महिन्यापूर्वीच संपली आहे. त्या संचालक मंडळांना पूर्वीच्या सरकारने वारवांर मुदत वाढ दिली. परिणामी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना मुदत संपून सुद्धा सत्ता उपभोगता आली.लोकसभा निवडणुका पाठोपाठ विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे सहकार क्षेत्रातील मात्तबर कमालीचे सुखावले होते. परंतु नव्या सरकारने दिलेल्या तडाख्यानंतर या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना आता सत्तेवरुन पाय उतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. सहकार खात्याकडून लवकरच म्हणजेच पुढील आठवड्यातच त्या त्या बाजार समित्यांसह सोसायट्यांवर प्रशासकाची नियुक्ती होईल, असा अंदाज आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकूण १७० बाजार समित्यांपैकी संचालक मंडळांची मुदत संपलेल्या ४५ बाजार समित्यांची यादी मागविली आहे. विशेषत: काँग्रेस आघाडी सरकारने प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या समित्यांची यादी प्राधान्याने मागविली असून, त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील हे मात्तबर चक्रावून गेले आहेत. अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर येथील बाजार समितीही मात्तबरांच्या ताब्यात आहेत. (वार्ताहर)या जिल्ह्यात काँग्रेस आघाडीबरोबर आता सत्तारुढ गटांतील म्हणजे भाजपसह शिवसेनेतील मात्तबर पुढाऱ्यांच्या ताब्यात सहकारी संस्था आहेत. जालना बाजार समितीवर माजीमंत्री अर्जुन खोतकर यांचे, भोक रदन बाजार समितीवर केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व आहे. जालना बाजार समितीच्या निवडणुकां संदर्भात गेल्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरु होत्या. परंतु त्या मंदावल्या. आता नव्या सरकारनेच घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या म्हणजे जालना बाजार समितीच्या निवडणुका होतील अशी चिन्हे आहेत.