जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाच जागांसाठी निवडणूक
By Admin | Updated: March 18, 2017 23:48 IST2017-03-18T23:44:26+5:302017-03-18T23:48:32+5:30
जालना: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या एकूण १७ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाच जागांसाठी निवडणूक
जालना: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या एकूण १७ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. पाच जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे मध्यवर्ती निवडणूक प्रक्रिया शासनाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आली होती. १८ मार्च निवडणूक अर्ज मागे घेण्याची तारीख होती. मात्र शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने कोणीच अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे पाच जागांसाठी २ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. नागरी बँक, व्हीजेएनटी व बिगरेशती गट साठी निवडणूक होत आहे. नागरी बँकांसाठी अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे तीन उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. व्हीजेएनटीसाठी एक अर्ज तर बिगरशेतीसाठी गटासाठी चार महिलांचे अर्ज आले आहेत. त्यात दोन भाजप व दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याचे सांगण्यात आले.