शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

निवडणूक काळात मोठ्या व्यवहारावर निवडणूक आयोग, आयकरचा डोळा

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 21, 2024 12:42 PM

निवडणूक आयोग, आयकर व बँका अलर्ट मोडवर; काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या काळात काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी निवडणूक आयोग, आयकर विभाग ते बँकांच्या ग्रामीण भागातील शाखेपर्यंत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

एखाद्या खात्यात अचानक होणाऱ्या मोठ्या व्यवहारावर बँकांची नजर आहेच, शिवाय बँकांना त्यांच्याकडील मोठी रक्कम जर दुसऱ्या शाखेत न्यायची असेल किंवा एटीएममध्ये भरण्यासाठी रक्कम ज्या वाहनातून नेली जाईल, त्यास जीपीएस प्रणाली लावणे व ‘क्यूआर कोड’ तयार करण्याचे आदेश आले आहेत. ‘क्यूआर कोड’ नसेल तर बँकेची रक्कमही जप्त होऊ शकते.

निवडणुकीच्या काळात काळा पैसा मोठ्या प्रमाणात व्यवहारात येत असतो. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी केलेल्या वाहन तपासणीत आढळलेला काळा पैसा जप्त करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर बँकेच्या वाहनांचा गैरवापर करीत काळा पैसा त्यातून नेण्यात येत असल्याचे उजेडात आले. यंदा निवडणूक आयोगाने बँकेच्या वाहनांसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक, नागरी सहकारी बँकांना जिल्हाधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापकाकडून निवडणूक आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

बँकांना वाहनावर लावावी लागेल जीपीएस प्रणालीनिवडणूक काळात बँकेच्या वाहनांचा काळा पैसा नेण्यासाठी गैरवापर होऊ नये. यासाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे बँकांना पाठविली आहेत. यात एका बँकेतून दुसऱ्या शाखेत किंवा एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ज्या वाहनांचा वापर होईल त्यास जीपीएस प्रणाली बसविण्यात यावी. याद्वारे वाहनावर संपूर्ण लक्ष ठेवले जाईल.

मोठी रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनावर ‘क्यूआर कोड’बँकेतून दुसऱ्या बँकेत रोख रक्कम पाठविली जाते. किंवा एटीएमसाठी रोख रक्कम नेली जाते. ही रक्कम कोट्यवधीत असते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बँकांसाठी सर्व वेबसाइट तयार करण्यात आली आहे. जिथून रोख रक्कम नेण्यात येणार ती रक्कम कोणत्या शाखेत पाठविण्यात येणार, किती रोख, कोण व्यक्ती ते वाहन नेणार, त्या वाहनाचा नंबर अशी संपूर्ण माहिती त्या वेबसाइटवर अपलोड करायची आहे. त्यानंतर त्याचा ‘क्यूआर कोड’ जनरेट होईल. तो ‘क्यूआर कोड’ वाहनांसोबत ठेवायचा आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने वाहनाची तपासणी केली तर त्यातील रक्कम व ‘क्यूआर कोड’ मध्ये देण्यात आलेली रक्कम मॅच होणे आवश्यक आहे. नसता पुढील कारवाईला तयार राहावे लागेल. यासाठी सर्व बँका ‘अलर्ट’ मोडवर काम करीत आहेत.- रूपेंद्र कोयाळकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक

आयकर विभागाचेही तुमच्या मोठ्या व्यवहारावर लक्षबँक खात्यात अचानक होणाऱ्या मोठ्या व्यवहारावर आयकर विभागाचे लक्ष आहे. संशयास्पद व्यवहार असल्यास बँकांना सात दिवसांच्या आत आयकर विभागाला कळविणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड जोडणीनंतर आयकर विभागाची ‘एआय’ प्रणालीच आता मोठे व्यवहार शोधून काढत आहे. तसेच, काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने राज्यात शीघ्र कृती पथक तयार केल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोख रक्कम नेत असाल तर सावधानतुम्ही जर बँकेतून किंवा अन्य ठिकाणाहून मोठी रोख रक्कम नेत असला तर सावधान. त्या रोख रकमेसंदर्भातील कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आयकर विभागाचे शीघ्रकृती पथक, निवडणूक आयोगाचे पथक यांनी रस्त्यात तुमचे वाहन थांबविले व रोख रकमेचे पुरावे तुमच्याकडे नसतील, त्याचा तुम्हाला खुलासा करता आला नाही तर ती रक्कम जप्त होऊ शकते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४