राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी औरंगाबादच्या खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:14 IST2019-02-20T01:13:18+5:302019-02-20T01:14:02+5:30

कोची येथे २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर फुटसाल स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील आर्यन चव्हाण, पुष्कर पाटील, भौमिक पांडे, मीसम खान, सत्यजित काळे, स्वस्तिक देवडा, ओमकार धुसे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

Election of Aurangabad players for the National Football Championship | राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी औरंगाबादच्या खेळाडूंची निवड

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी औरंगाबादच्या खेळाडूंची निवड

औरंगाबाद : कोची येथे २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर फुटसाल स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील आर्यन चव्हाण, पुष्कर पाटील, भौमिक पांडे, मीसम खान, सत्यजित काळे, स्वस्तिक देवडा, ओमकार धुसे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवत महाराष्ट्राच्या संघातील आपले स्थान निश्चित केले. औरंगाबादच्याच आकिब सिद्दीकी यांची महाराष्ट्राच्या सिनिअर संघात निवड झाली आहे. प्रशिक्षक म्हणून केम्ब्रिज प्रशालेतील क्रीडा शिक्षक रणजित भारद्वाज यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

Web Title: Election of Aurangabad players for the National Football Championship