कढईत पडल्याने वृद्धाचा मृत्यू
By Admin | Updated: June 2, 2014 00:50 IST2014-06-02T00:47:03+5:302014-06-02T00:50:40+5:30
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे हळद शिजविताना कढईत पडल्याने ६० वर्षीय इसमास अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कढईत पडल्याने वृद्धाचा मृत्यू
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे हळद शिजविताना कढईत पडल्याने ६० वर्षीय इसमास अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाल्याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्याने रविवारी गोरेगाव पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली. म्हाळशी येथील संपत नारायण वाठोरे (वय ६०) हे आपल्या शेतात ५ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कढईमध्ये हळद शिजवित होते. त्यावेळी कढईत पडल्यामुळे ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील समोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ६ मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयातील डॉ. ए. एच. वाघमारे यांच्या वतीने वार्ड बॉय प्रफुल्ल अध्याल यांनी पोलिसांना कळविली. त्याबाबतची कागदपत्रे १ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजमोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मुजीब पठाण करीत आहेत. (प्रतिनिधी)