हॉटेलमध्ये एकास मारहाण
By Admin | Updated: August 26, 2015 00:46 IST2015-08-26T00:34:08+5:302015-08-26T00:46:21+5:30
जालना : शहरातील सफारी बिअर बारमध्ये सुनील भुरेवाल या युवकास जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सांयकाळी घटली. या प्रकरणी चार जणांविरूद्ध तालुका

हॉटेलमध्ये एकास मारहाण
जालना : शहरातील सफारी बिअर बारमध्ये सुनील भुरेवाल या युवकास जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सांयकाळी घटली. या प्रकरणी चार जणांविरूद्ध तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूरेवाल हे सोमवारी बिअरबार मध्ये दारू पित बसले असता शेजारील टेबल वरील चार अनोळखी इसमांनी क्या कर रहा है, असे विचारे तेव्हा एॅन्जाय कर रहा हुॅ. असे उत्तर देताच भूरेवाल यास त्या चार जणांनी मारहाण करून डोके फोडले. त्यास बार मालक गणेश भूरेवाल व कामगारांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.
मंगळवारी दवाखान्यात आलेल्या एमएलसी अहवालावरून तालुका जालना पोलिसांनी भूरेवाल यांचा जबाब नोंदवून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)