एकाने बुट उगारला; दुसर्‍याने ठोसा मारला

By Admin | Updated: May 18, 2014 00:48 IST2014-05-18T00:18:14+5:302014-05-18T00:48:08+5:30

लातूर : लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात दोन उपजिल्हाधिकार्‍यांमध्ये चांगलीच जुंपली.

Ekani boot exhausted; Another hit | एकाने बुट उगारला; दुसर्‍याने ठोसा मारला

एकाने बुट उगारला; दुसर्‍याने ठोसा मारला

लातूर : लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात दोन उपजिल्हाधिकार्‍यांमध्ये चांगलीच जुंपली. एकाने बुट उगारला तर दुसर्‍याने ठोसा लगावला. मतमोजणी असल्यामुळे या प्रकरणाची ना वाच्यता ना कारवाई. एरवी शिस्तभंग प्रकरणावरून कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या या उपजिल्हाधिकार्‍यांवर बेशिस्तपणाची कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणूक कामाचे अधिकार आणि वैयक्तिक इगो यातून हे प्रकरण उद्भवले असल्याची चर्चा दबक्या आवाजात कर्मचार्‍यांमध्ये होती. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी दोघा उपजिल्हाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीला प्रारंभ झाला. ‘मी मोठा की तू मोठा’ असे म्हणत एकाने दुसर्‍यावर बुट उगारला. त्यास प्रत्युत्तर देत दुसर्‍याने पहिल्यास ठोसा लगावला. तणावाचे प्रकरण पाहून उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करीत दोन्ही उपजिल्हाधिकार्‍यांची समजूत काढली. मतमोजणीच्या पूर्वसंध्येस घडलेल्या या घटनेची सांगोवांगी चर्चा झाली. शुक्रवारी मतमोजणी असल्यामुळे प्रकरणाची वाच्यता कोणीही केली नाही. मात्र ही कृती अशोभनिय असल्याचे अनेक कर्मचार्‍यांचे म्हणणे होते़ (प्रतिनिधी) मतमोजणी केंद्र लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रातच दोन उपजिल्हाधिकार्‍यांमध्ये जुंपली़ एकाने बुट उगारला तर दुसर्‍याने तर त्याला ठोसा लगावला़ मतमोजणी केंद्रावर असताना दोघांमध्ये झालेल्या वादाची चर्चा चांगलीच रंगली़ शिवाय, उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांसमारे घातलेला गोंधळ बेशिस्तीचा असल्याचे मत कर्मचार्‍यांनी व्यक्त केले़

Web Title: Ekani boot exhausted; Another hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.