आठ ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त

By Admin | Updated: May 22, 2014 00:14 IST2014-05-21T23:41:25+5:302014-05-22T00:14:32+5:30

कसबे तडवळे : सुमारे दोन महिन्यांपूर्वी कसबे तडवळे परिसराला वादळी वार्‍याने झोडपले होते. त्यावेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

Eight Transformers Bad | आठ ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त

आठ ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त

कसबे तडवळे : सुमारे दोन महिन्यांपूर्वी कसबे तडवळे परिसराला वादळी वार्‍याने झोडपले होते. त्यावेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल दोन महिन्यानंतरही या स्थितीत फारसा फरक नसल्याचे दिसून येते. तेरणा शिवारातील तब्बल आठ ट्रान्सफार्मर तेव्हापासून नादुरूस्त आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून उभ्या पिकांचेही अतोनात नुकसान होत आहे. कसबे तडवळे गावाला पाच ठिकाणाहून वीजपुरवठा केला जातो. वाघोली व खामसवाडी उपकेंद्रातून सध्या सुरळीत वीजपुरवठा होत आहे. परंतु, ढोकी व येडशी उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. थोडाही पाऊस झाला की, तडवळ्याची वीज गायब होते. दुसर्‍या दिवशी कर्मचारी दुरूस्ती करतात. त्यानंतर पुन्हा वादळी पाऊस झाला की, ‘ये रे माझ्या मागल्या’, हा प्रकार सुरू असतो. येडशीहून तेरणा शिवारातील आठ ट्रान्सफार्मरला वीज पुरविली जाते. हे आठही ट्रान्सफार्मरवरून सुरळीत वीजपुरवठा होत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Eight Transformers Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.