आठ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 17, 2017 22:43 IST2017-01-17T22:41:50+5:302017-01-17T22:43:51+5:30

बीड : ओबीसी आयोगाच्या अध्यादेशात बिगर ओबीसींना स्थान दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली होती.

Eight protesters filed a complaint | आठ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

आठ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

बीड : ओबीसी आयोगाच्या अध्यादेशात बिगर ओबीसींना स्थान दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात आठ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंद झाला.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत, अर्जुन दळे, संजय गुरव, विक्रम बिडवे, किशोर राऊत, नितीन साखरे, दिलीप बेदरे, बाळू धोतरे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगीशिवाय आंदोलन करुन शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. शिवाय अध्यादेशाची प्रत जाळण्यात आली होती. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोहेकॉ शंकर राठोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eight protesters filed a complaint