कोरोनानंतर विमानसेवेच्या आठ महिन्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:02 AM2021-02-11T04:02:01+5:302021-02-11T04:02:01+5:30

जानेवारीत प्रवाशांची संख्या सर्वाधिक हवाई झेप : औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भामुळे गतवर्षी विमानसेवा काही काळ ठप्प ...

Eight months into the airline after Corona | कोरोनानंतर विमानसेवेच्या आठ महिन्यांत

कोरोनानंतर विमानसेवेच्या आठ महिन्यांत

googlenewsNext

जानेवारीत प्रवाशांची संख्या सर्वाधिक

हवाई झेप : औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भामुळे गतवर्षी विमानसेवा काही काळ ठप्प होती. विमानसेवा सुरू होऊन आता आठ महिने होत असून, यात सर्वाधिक प्रवासी संख्या ही नव्या वर्षात म्हणजे जानेवारीत राहिली. तब्बल २२ हजार ८७९ प्रवाशांनी या महिन्यात प्रवास केला. विमानसेवेला प्रवासी संख्येचे बुस्टर मिळाले आहे.

जून २०२० पासून औरंगाबादेतील विमानसेवेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. सर्वांत आधी दिल्ली विमानसेवेला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यात हैदराबाद, मुंबई, बंगलोर, अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू झाली. कोलकाता, चैन्नईसह इतर शहरांनाही कनेक्टिंग फ्लाईटद्वारे प्रवाशांना जाणे शक्य झाले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रारंभी विमान प्रवाशांची संख्या अल्प होती. परिणामी, जून २०२० मध्ये केवळ ४८९ प्रवाशांनी हवाई सफर केली होती. जूननंतर मात्र प्रवासी संख्येत वाढ होत गेली. विशेषत: ऑक्टोबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. त्यातून नव्या विमानसेवेबरोबर प्रवासी संख्याही आणखी वाढत गेली.

विमान प्रवाशांत वाढ

डिसेंबर महिन्यात जवळपास १८ हजार विमान प्रवासी संख्या होती. ही संख्या जानेवारीत २२ हजारांवर गेली. औरंगाबादच्या विमान प्रवाशांत चांगली वाढ होत आहे.

- डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ

विमान प्रवासी संख्या

महिना- प्रवासी

जून- ४८९

जुलै - ३,४९९

ऑगस्ट- ६,१७६

सप्टेंबर- ९,३६३

ऑक्टोबर - १५, ०५९

नोव्हेंबर- २०, ४३८

डिसेंबर - १८,६४०

जानेवारी - २२,८७९

Web Title: Eight months into the airline after Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.