लातुरात होणार शैक्षणिक जागर

By Admin | Updated: May 24, 2014 01:37 IST2014-05-24T01:29:01+5:302014-05-24T01:37:14+5:30

लातुरात होणार शैक्षणिक जागर

Education will be going on in the morning | लातुरात होणार शैक्षणिक जागर

लातुरात होणार शैक्षणिक जागर

. लातूरमध्ये पहिल्यांदाच हे एक्झिबिशन होत आहे. भव्य आणि दिव्य अशा या एक्झिबिशनमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशा मिळणार आहेत. ‘लोकमत’ अस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मध्ये विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, मुक्त विद्यापीठ, शैक्षणिक कर्ज देणार्‍या बँका, शैक्षणिक संस्था सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी योग्य ती दिशा मिळावी, हा उद्देश समोर ठेवून ‘लोकमत’ने एक्झिबिशनचे आयोजन केले आहे. लातूर शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावण्यासाठी शाळा-महाविद्यालयांची नोंदणी सुरू आहे. ज्या शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना ‘लोकमत’च्या या अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मध्ये स्टॉल लावायचा आहे, त्यांनी ८४२१४०५४५७ (गणेश), ७३८५८८६५८६ (संतोष), ९०९६३५९३९८ (ओंकार) यांच्याशी संपर्क साधावा. ‘लोकमत’ने अस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ हा उपक्रम अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर येथे घेण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ अस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ हा उपक्रम तीन दिवस चालणार असून, त्यात शैक्षणिक संस्थांना आपल्या शाळा-महाविद्यालय व इन्स्टिट्यूटमधून दिल्या जाणार्‍या शैक्षणिक सुविधांची तसेच विविध कोर्सची माहिती स्टॉल्सच्या माध्यमातून देता येणार आहे. त्यातून विद्यार्र्थ्यांना करिअरची दिशा निवडता येणार आहे.

Web Title: Education will be going on in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.