शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मजुरी करत शिक्षण, लष्करी सेवेने आयुष्याला कलाटणी; गोल्डन बॉय अविनाशने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 11:41 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये सोनेरी कामगिरी करणारा बनला पहिला भारतीय पुरुष खेळाडू

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचा सुपुत्र अविनाश साबळे याने चीनमधील हांगझाऊ येथे रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचताना ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये गोल्डन कामगिरी करणारा अविनाश साबळे हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. तसेच बीड जिल्ह्यातील मांडवा या गावातील २९ वर्षीय साबळेने हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदकही जिंकून दिले.

अविनाश साबळेने ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा आठ मिनिट १९.५० सेकंदात पूर्ण केली. तसेच त्याने आठ मिनिट २२.७९ सेकंदाचा आशियाई विक्रम तोडला. जो की, २०१८ मध्ये जकार्ता येथे इराणच्या हुसेन केहानी याने हा विक्रम केला होता.उल्लेखनीय बाब म्हणजे प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित अविनाश साबळे याने २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केनियन खेळाडूंचे वर्चस्व मोडीत काढताना ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळेसही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

लष्करात दाखल झाल्यानंतर मिळाली कलाटणीअविनाश साबळे हा छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीत होता. क्रीडा प्रबोधिनी सोडल्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण मोलमजुरी करून केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी तो २०१५ मध्ये लष्करात दाखल झाला आणि त्याच्या कारकिर्दीला येथूनच कलाटणी मिळाली. २०१७ मध्ये जानेवारीत प्रथमच त्याने छत्तीसगढ येथील राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत १० कि.मी. शर्यतीत धावला. अविनाश प्रमोशन मिळावे, यासाठी २०१७ मध्ये स्टीपलचेसकडे वळाला व पहिले सुवर्ण त्याने २०१७ मध्ये चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले. २०१९ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अविनाशच्या नावावर नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत. त्यात त्याने गोपाल सैनी यांनी १९८१ मध्ये टोकियोत केलेला आठ मि. ३०.८८ सेकंदाचा विक्रम मोडत २०१८ मध्ये भुवनेश्वर येथील राष्ट्रीय स्पर्धेत आठ मि. २९.८० सेकंदाचा नवीन विक्रम रचला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडMarathonमॅरेथॉन