शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले निलंबित
By Admin | Updated: May 17, 2016 00:04 IST2016-05-17T00:01:55+5:302016-05-17T00:04:08+5:30
नांदेड : लोहा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केशव केरबा मेकाले यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सोमवारी निलंबित केले़

शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले निलंबित
नांदेड : लोहा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केशव केरबा मेकाले यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सोमवारी निलंबित केले़
लोहा तालुक्यातील आंडगा ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी १५ मे रोजी ग्राम संवाद कार्यक्रमातंर्गत गावात मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी जि़ प़ शाळेला भेट देवून नावीण्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली़ तेव्हा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला पालक सभेचा उपक्रम शाळेत सुरू नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़
लक्षवेधी नमस्कार, सात ते नऊ टीव्ही बंद अभियान या उपक्रमाची माहिती पालक व विद्यार्थ्यांना नसल्याचे आढळून आले़ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेला केवळ दिखाऊ भेटी दिल्या त्यामुळे गुणवत्तेसाठी त्याचा उपयोग झाला नाही़ आणि तिसरीच्या मुलांना साधी जोडाक्षरेसुद्धा वाचता येत नव्हती़ पाचव्या वर्गातील मुलेसुद्धा अडखळत वाचत होती़
त्यामुळे सीईओ काळे यांनी गट शिक्षणाधिकारी पी़ एम़ कुलकर्णी यांना त्या शाळेतील प्रत्येक मुलांच्या गुणवत्तेची तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली़ (प्रतिनिधी)