शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महापालिकेत ‘ईडी’ची झाडाझडती; रात्री उशिरापर्यंत घेतली योजनेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:15 IST

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ईडी’चे अधिकारी रात्री महापालिकेत दाखल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निविदा प्रकरणाशी संबंधित कंत्राटदारांच्या घरांवर शुक्रवारी सकाळीच ‘ईडी’ने धाडी टाकल्या. दिवसभर खोदकाम केल्यानंतर पथकातील एक अधिकारी सायंकाळी महापालिकेत दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अपर्णा थेटे, घरकूल योजनेचे प्रमुख खमर शेख आदींकडून संपूर्ण योजनेचा तपशील जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी तत्कालीन प्रशासक यांनी अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली होती. समितीच्या मंजुरीनंतर ‘समरथ कन्स्ट्रक्शन’ या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने निविदा कशा पद्धतीने प्रसिद्ध केली, एकूण किती निविदा आल्या होत्या, अपात्र निविदाधारक किती होते, प्रकल्पाची एकूण किंमत, कंपनीने काम मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लावली, या कागदपत्रांची पडताळणी कशा पद्धतीने मनपाने केली, कंत्राटदाराने घरांसाठी किंमत कशा पद्धतीने निश्चित केली, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती ईडी अधिकाऱ्याने केल्याचे कळते.

मनपात एकच खळबळपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘ईडी’चे पथक शहरात दाखल झाल्याची वार्ता सकाळीच मनपा अधिकाऱ्यांनाही लागली होती. महापालिकेतही पथक येणार का? अशी विचारणा अधिकाऱ्यांकडून एकमेकांना करण्यात येत होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ईडी’चे अधिकारी रात्री महापालिकेत दाखल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

मनपा प्रशासक बाहेरगावीमहापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी यापूर्वी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. आवास योजनेतील अनेक पैलूंवर चर्चाही केली होती. गुरुवारी सकाळीच ते बाहेरगावी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी धाडसत्र शहरात सुरू झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका