शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केरळसह औरंगाबादमध्ये ईडीचा छापा; पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयात अडीज तास झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 14:49 IST

Popular Front of India: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे  महाराष्ट्र कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे.

ठळक मुद्देईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन सकाळी १० वाजता धडक मारली.

औरंगाबाद: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शहरातील राज्य कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली. सुमारे अडीज तास कार्यालयाची झाडाझडती घेऊन आणि दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी करून पथक परतले. तसेच केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलामराम यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापा टाकला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे  महाराष्ट्र कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन सकाळी १० वाजता धडक मारली. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना गुरुवारी अमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी इश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इर्फान मिली आणि कलीम यांची अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. 

आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदपत्रे जप्त उच्च शिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कुठून येतो. संस्थेचे देणगीदार कोण आहे? कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयावर नियंत्रण ठेवले जाते ? यासह अन्य मुद्द्यावर चौकशी केली. यावेळी ईडी च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबूक बॅंक स्टेटमेंट आदी कागदपत्रासह संस्थाच्या विविध उपक्रमाबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय  जीएसटी कार्यालयात नेऊन चौकशी केली. कार्यालयात जप्त कागदपत्राविषयी आणि झडतीबद्दल पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय