शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
2
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
3
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
4
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
5
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
6
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
8
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
9
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
10
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
11
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
12
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
13
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
14
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
15
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
16
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
17
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
18
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
19
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!
20
VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधक जागीच ठार; घरी गर्भवती पत्नी वाट पाहत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:05 IST

कारच्या अतिवेगामुळे प्राध्यापक आणि त्यांची मुलगी दुचाकीसह हवेत उडून दूरवर फेकले गेले.

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिकण्यासाठी आलेल्या भाचीला विद्यापीठातील वसतिगृहात सोडून घरी परतत असलेल्या संशोधकाचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी रात्री ०९:३० वाजता बेगमपुऱ्यातील विद्युत कॉलनीत हा अपघात घडला. ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७), असे मृताचे नाव असून, दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची मुलगी मेंदूला मार लागल्याने गंभीर जखमी झाली.

अंबड तालुक्यातील हसनापूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर एका खासगी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. पत्नी, मुलीसह ते विद्युत कॉलनीत राहत. त्यांची भाची विद्यापीठात शिकते. बुधवारी ती ज्ञानेश्वर यांच्या घरी गेली होती. रात्री ०९:३० वाजता ते चार वर्षांच्या मुलीसोबत भाचीला विद्यापीठातील वसतिगृहात सोडण्यासाठी गेले. तेथून अंतर्गत रस्त्याने ते घराकडे निघाले. त्याच वेळी सुसाट कार (एमएच २० एचएच ८२५२) समोरून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला उडवले. कारच्या अतिवेगामुळे ज्ञानेश्वर व त्यांची मुलगी दुचाकीसह हवेत उडून दूरवर फेकले गेले. ज्ञानेश्वर जागीच ठार झाले. मुलीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी धाव घेत चालक व कारला ताब्यात घेतले.

अर्थशास्त्रात अत्यंत हुशार, पीएच.डी. सुरू होतीशेतकरी कुटुंबातून आलेेले ज्ञानेश्वर अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांची अर्थशास्त्रात पीएच.डी. सुरू होती. त्यांचे आई, वडील गावाकडे शेती करतात. अपघाताची माहिती कळताच विद्यापीठातील अनेक विद्यार्थी, संशोधकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.

गर्भवती पत्नी वाट पाहत होतीज्ञानेश्वर यांची पत्नी गर्भवती आहे. त्यामुळे त्या एकट्या घरी थांबल्या होत्या. रात्री पती, मुलीची वाट पाहणाऱ्या ज्ञानेश्वर यांच्या पत्नीला अपघाताची माहिती कशी द्यावी, असा भावनिक पेच नातेवाइकांसमोर निर्माण झाला होता.

चार दिवसांपूर्वी खरेदी केली होती कारबेगमपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारचालक शेख करीम शेख (३९, रा. कुंभार गल्ली, बेगमपुरा) याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार दिवसांपूर्वीच त्याने सदर कार खरेदी केल्याचे तपासात समजले.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding car kills economics researcher; pregnant wife awaits at home.

Web Summary : An economics researcher died in a car accident returning from dropping his niece. His daughter is critically injured. The driver was arrested. His pregnant wife was waiting for them.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद