शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

बुरशीजन्य भगर खाल्ल्यास होईल विषबाधा; एकादशीच्या पार्श्वभूमीवर रहा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:52 IST

भेसळयुक्त भगर विक्री टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : उपवास कुठलाही असू देत, फराळात बहुतांश वेळा भगर खाल्ली जाते. ही भगर जर बुरशीचा प्रादुर्भाव झालेली असेल तर अन्नातून विषबाधा होऊन गंभीर आजाराला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिला आहे.

भेसळयुक्त भगर विक्री टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करणार आहे. पॅकबंद भगरची विक्री, पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकिंग व अंतिम वापर तारीख आहे की नाही, याची तपासणी होईल. मुदतबाह्य भगर किंवा पिठाची विक्री होताना आढळल्यास तसेच भेसळयुक्त, बुरशीयुक्त भगरची विक्री करणाऱ्या वा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही फुलारी यांनी दिला आहे.

भगरीवर कोणती बुरशी असते...भगरीवर ‘अस्परगिलस’ प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास त्यातून विषबाधा होऊ शकते.

भगर खाण्यापूर्वी व खाताना कोणती काळजी...शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. सुटी भगर घेऊ नका. भगर घेताना पाकिटावरील पॅकिंग व अंतिम वापर तारीख तपासा. भगर साठवताना ती कोरड्या ठिकाणी, झाकणबंद डब्यात ठेवा. जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस साठवलेली भगर व पीठ खाऊ नका. शक्यतो भगरीचे पीठ विकत आणू नका. पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या, भाकरीऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक तेवढेच दळून घ्या. बाहेरून दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. दोन ते तीन दिवस सलग उपवासाच्या पदार्थांचे सेवन केल्यास ॲसिडिटी होऊन उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होऊ शकतात.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न