शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आमदनी अठन्नी खर्चा रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 00:43 IST

औरंगाबाद : शासनाने विविध कल्याणकारी योजना, विकास कामांसाठी मागील दीड ते दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

औरंगाबाद : शासनाने विविध कल्याणकारी योजना, विकास कामांसाठी मागील दीड ते दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे तिजोरीत ८२ कोटी रुपये पडून आहेत. हा निधी दुसऱ्या विकास कामांसाठी अजिबात वापरता येत नाही. मागील काही दिवसांपासून उत्पन्न दररोज फक्त २० ते ३० लाख रुपये एवढे तुटपुंजे येत आहे. मनपावर दररोजचा खर्च ९० लाख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनपाने तयार केलेल्या अर्थसंकल्पानुसार जुलै अखेरपर्यंत तिजोरीत ३५८ कोटी ६८ लाख रुपये अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९३ कोटी ८३ लाख रुपये आले. तुटीचा आकडा १६४ कोटी ८५ लाख आहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, गटनेता भाऊसाहेब जगताप, नासेर सिद्दीकी, गजानन बारवाल यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला तिजोरीत ८२ कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न करण्यात आला. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी खुलासा केला की, विविध योजनांच्या (पान ५ वर)महापालिकेतील आर्थिक परिस्थिती पाहून मनपा पदाधिकारी क्षणभर ‘झिंगाट’झाले होते. बैठकीत काय बोलावे हो कोणालाही सूचत नव्हते. ४मागील आठ-दहा बैठकांपासून पदाधिकारी वसुली वाढवा, विकासकामे करा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहे. यातील एकाही सूचनेचे पालन प्रशासनाने केले नाही. प्रशासन जर आमचे ऐकणारच नसेल तर यापुढे आम्ही पंधरा दिवसांतून एकदा घेण्यात येणारी आढावा बैठकही घेणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.शहरातील खड्डे, पाणी, डेंग्यू, पथदिवे, वॉर्डातील विकासकामे आदी सर्वच आघाड्यांवर प्रशासन अपयशी ठरले आहे. ४प्रशासनाने शहराची अक्षरश: वाट लावून टाकावी. आम्हाला आता जे करायचे आहे, ते सर्वसाधारण करून दाखवू असा इशारा महापौरांनी दिला. पुढच्या वेळेस हे नगरसेवक निवडूनच येऊ नये असा डावच प्रशासनाने रचल्याचा आरोप सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी केला. शहराच्या विकासावर आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.शहराची अवस्था एखाद्या तालुक्यासारखी झाली आहे. महापालिकेसारख्या कोणत्याच सोयीसुविधा नागरिकांना मिळत नाही. उलट नागरिकांकडून महापालिकेचा कर वसूल करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेत मनपा नको नगर परिषद करा असा ठराव ठेवा असा सल्ला नगरसेवक नासेर खान यांनी दिला. शासनाला किमान आपल्या भावना तरी या ठरावामुळे कळतील, असेही त्यांनी नमूद केले.