ई-स्कॉलरशीप विद्यार्थ्यांच्या खात्यावर
By Admin | Updated: May 19, 2014 00:14 IST2014-05-18T23:41:25+5:302014-05-19T00:14:32+5:30
हिंगोली : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना

ई-स्कॉलरशीप विद्यार्थ्यांच्या खात्यावर
हिंगोली : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने निश्चित केलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती या योजनेचा लाभ देण्यात येतो. यंदाची ई-स्कॉलरशीपची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ई-स्कॉलरशिप योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक तरतुदीनुसार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मंजूर करण्यात आलेले असून जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या बँक खात्यावर इसीएस मार्फत रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. राज्यातील काही महाविद्यालयाकडून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेसाठी राज्य शासनाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम निधीअभावी राज्य शासनाकडून प्राप्त झालेली नसल्याच्या कारणावरून विभाजन, इमाव व विमाप्र प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यासाठी परवानगी नाकारण्यात येत असल्याचे या संचालनालयाच्या निदर्शनास आलेले आहे. ही गंभीर स्वरुपाची बाब असून अशी कृती करणारी महाविद्यालये कारवाईस पात्र राहणार आहेत. परीक्षेस बसण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक केल्यास त्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. राज्य शासनाने निश्चित केलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी ई-स्कॉलरशिप योजनेंतर्गत २०१३-१४ या वर्षात आॅनलाईन अर्ज केलेला आहे. अशा काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क नियमानुसार मंजूर करण्यात येईल, तेंव्हा वर नमूद प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न संबंधित महाविद्यालयाकडून झाल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येवून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, महाराष्टÑ राज्य पुणे कळविले आहे. (प्रतिनिधी)