जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई - पॉस मशीन

By Admin | Updated: June 11, 2017 00:29 IST2017-06-11T00:29:03+5:302017-06-11T00:29:57+5:30

नांदेड : जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई- पॉस मशीन बसविण्यात आल्यामुळे आता काळ््या बाजारातील खतविक्रीला लगाम बसणार आहे.

E-POS Machine in 504 locations in the district | जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई - पॉस मशीन

जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई - पॉस मशीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई- पॉस मशीन बसविण्यात आल्यामुळे आता काळ््या बाजारातील खतविक्रीला लगाम बसणार आहे. जिल्ह्यात १ जूनपासून शासनाकडून (डीबीटी) थेट हस्तांतरण योजना राबविण्यात येत आहे़
शेतकऱ्यांच्या खताच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन अनेक विक्रेत्यांकडून खताची काळ््या बाजारात जादा दराने विक्री केली जात होती़ खत उत्पादक कंपन्यांनी जेवढी खताची निर्मिती केली व विक्री केंद्राना खत वितरित केले त्यानुसार अनुदान मिळत होते. मात्र आता थेट हस्तांतरणामुळे शेतकऱ्यांनी जेवढे खत खरेदी केले आहे. तेवढ्यावरच खत उत्पादक कंपन्यांना अनुदान मिळणार आहे.
ज्या खतविक्रेत्याकडे एमएफएमएस आयडी तयार असेल अशा विक्रेत्यांनाच ई-पॉज मशीन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजारावर खत विक्रेत्यांची संख्या असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०४ मशीन खत विक्री केंद्रावर बसविण्यात आल्या आहेत़ उर्वरित विक्रेत्यांना एमएफएसआयडी तयार केल्यानंतर मशीनचे टप्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे़ शेतकऱ्यांना खताची खरेदी करण्यासाठी स्वत:चे आधारकार्ड वापरणे बंधनकारक केले आहे. खरेदीदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यास आवश्यक असलेल्या खताचे विवरण या नोंदी खत विक्रेत्याना पीओएस मशीनवर नोंदवाव्या लागणार आहे़ या नोंदीसाठी शेतकऱ्याने स्वत:च्या हाताच्या बोटाचा ठसा मशीनवर द्यावा लागणार आहे. पीओएस मशीनवर सीमकार्ड तसेच इंटरनेटद्वारे आधार लिंक करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची ओळख पटल्यानंतरच त्यास खताची खरेदी करता येणार आहे. काही कारणास्तव शेतकरी स्वत: उपस्थित राहू न शकल्यास त्याच्यावतीने दुसरा व्यक्तीसुद्धा खताची खरेदी करु शकेल. मात्र त्याच्याकडे खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पीओएस मशीन काम करीत नसल्यास किंवा त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास खत विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना खताची विक्री केली जाईल.

Web Title: E-POS Machine in 504 locations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.