उंडणगावात अचलपूर महसूल विभागाच्या पथकाचा ई-पीक अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:54+5:302021-02-05T04:08:54+5:30
राज्य शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, ई पीक पाहणी ॲप्स निर्माण करण्यात आले होते. याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांनी ...

उंडणगावात अचलपूर महसूल विभागाच्या पथकाचा ई-पीक अभ्यास दौरा
राज्य शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, ई पीक पाहणी ॲप्स निर्माण करण्यात आले होते. याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील उभ्या पिकांची ई-पीक पाहणी ॲप्सद्वारे भरणे गरजेचे आहे अनेकदा अवकाळी पाऊस, गारपीट किंवा एखादे नैसर्गिक आपत्तीने शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊन जाते. शेतकऱ्यांना मोबदला काहीच मिळत नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. कधी नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्यास मदत होईल. हे शेतकऱ्यांच्या लाभासाठी ई पीक पाहणी ॲप्स महत्त्वपुर्ण ठरत आहे.
ई-पीक नोंदणीत उंडणगाव तालुक्यात प्रथम
उंडणगाव हे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ई पीक ऑनलाईन नोंदणी करणारे सिल्लोड तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गाव आहे. त्यामुळे या गावाला भेट व अभ्यास दौरा करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका तहसीलदार मदन अशोकराव जाधव, नायब तहसीलदार अक्षय मंडवे, मंडळ अधिकारी परवेज पठाण, तलाठी जगदीश पानसे, निखिल बेलोकार, कौस्तुभ रोकडे हे पथक आले होते. ई पीक पाहणीचा अभ्यास दौरा केला. यावेळी सिल्लोड तहसीलचे नायब तहसीलदार संजय सोनवणे, ई -पीक जिल्हा समन्वयक नारायण कदम, मंडळ अधिकारी राजू ससाणे, तलाठी विष्णू सोनुने, काशिनाथ ताठे, कोतवाल राजू बसये, सुभाष राऊत, भरत भोरकडे, कृष्णा धनवई, अजय नाईक, शेख मतीन, दीपक पंडित, आत्माराम दुतोंडे, मनोज खंडेलवाल, नीलेश कुमावत, आदी गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
----------------------
सोबत फोटो कॅप्शन : अचलपूर येथील महसूल व तहसील कार्यालयाचे एक पथक ई पीक पाहणी ॲप्सच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी आलेले आहे. त्या पथकाला ई पीक पाहणी ॲप्स कशा पद्धतीने वापर करून काम केले याबाबत सविस्तर माहिती रघुनाथ सावळे, तलाठी विष्णू सोनुने यांनी दिली.