ड्युरोव्हॉलच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:20 IST2019-01-17T18:56:21+5:302019-01-17T20:20:55+5:30
वाळूज एमआयडीसीतील ड्युरोव्हॉल कंपनीच्या व्यवस्थापन व भारिपप्रणीत न्यू पँथर सेनेत वेतनवाढीचा यशस्वी करार करण्यात आला आहे.

ड्युरोव्हॉलच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील ड्युरोव्हॉल कंपनीच्या व्यवस्थापन व भारिपप्रणीत न्यू पँथर सेनेत वेतनवाढीचा यशस्वी करार करण्यात आला आहे. या करारामुळे कामगारांना जवळपास १४ हजार ४४३ रुपयांची भरघोस वेतनवाढ मिळणार आहे.