शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय ग्रंथालयासमोर ‘कचराकोंडी’...वाचनसंस्कृती कशी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:47 IST

आंदोलने, निवेदने, विनंत्या : ढिम्म प्रशासनाला पडला नाही काडीचाही फरक

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : विभागीय ग्रंथालयासमोर महापालिकेकडून गेल्या सात वर्षांपासून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. यामुळे दुर्गंधी, घाण, मोकाट कुत्री आणि अस्वच्छतेचा प्रचंड त्रास वाचनालयात येणारे वाचक, विद्यार्थी आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. वाचनालयाची भिंत जेसीबीमुळे अक्षरक्ष: खचली असून, कधीही कोसळू शकते. गेल्या काही वर्षांत आंदोलने, निवेदने, विनंत्या सर्व काही करून पाहिले मात्र ढिम्म प्रशासनाला काडीचाही फरक पडलेला नाही.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे ५० ते १०० विद्यार्थी दररोज वाचनालयाचा वापर करतात. कचरा व त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे विद्यार्थी सांगतात. वाचनालयात प्रवेश करतानाच कचऱ्याचा ढिगारा स्वागत करतो. अभ्यास करणे कठीण होते. या प्रश्नावर विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींनी यापूर्वी आंदोलनही केले, मात्र त्यातूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.

मुंबईवरून तक्रारीवाचनालय प्रशासनानेही माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना निवेदन देण्यापासून ते सध्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचविल्या. राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सुद्धा मुंबईहून आयुक्तांना पत्र पाठविले. तक्रारीनंतर दोन दिवस परिसरात स्वच्छता दिसते; मात्र तिसऱ्याच दिवशी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कचऱ्याचे ढीग आणि असह्य दुर्गंधी पसरते, असा आरोप वाचनालय प्रशासनाने केला.

ठोस कारवाई नाहीवाचनालयात आयोजित कार्यक्रमांसाठी मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ते हा प्रश्न सोडवतील. परंतु, प्रत्यक्ष पाहूनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

अनेकदा मनपासोबत पत्रव्यवहार केले, आंदोलने केली. स्मार्ट सिटीने मध्यंतरी स्वच्छता केली. पुन्हा कचरा टाकणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’. आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो; पण भेट होऊ शकली नाही.

सात वर्षांत पुष्कळ प्रयत्न केले; पण काहीही झाले नाही.-सुनील हुसे, सहायक ग्रंथालय संचालक

कचऱ्यामुळे डास, दुर्गंधीचा त्रास होतो. डोकेदुखीही होते. एकाग्रता साधणे कठीण जाते.-आकाश बोर्डे, विद्यार्थी

कचऱ्यामध्ये अनेकदा मासही असते. त्यामुळे कुत्रेही जमा होतात. हाड अनेकदा वाचनालयाच्या आतही ते आणून टाकतात. भिंत तर खचलीच आहे शिवाय रंगरंगोटीही अनेक वर्षे झाली नाही.-संदीप पवार, वाचक

नागरिक कचरा टाकतातसमर्थनगर येथील विभागीय ग्रंथालयासमोर मनपाचे ट्रान्सफर स्टेशन बऱ्याच दिवसांपासून बंद करण्यात आले. या ठिकाणी रहिवासी कचरा आणून टाकतात. हा कचरा उचलून तेथे साफसफाई करण्याचे काम दररोज वॉर्ड कार्यालयामार्फत करण्यात येते. येथे कचरा येऊच नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना मनपाकडून करण्यात येत आहे. तेथे शौचालय उभारता येईल काय, याची चाचपणी सुरू आहे.- नंदकिशोर भोंबे, उपायुक्त, मनपा.

English
हिंदी सारांश
Web Title : Garbage woes plague Chhatrapati Sambhajinagar library, impacting reading culture.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar library faces garbage issue for seven years. Students suffer due to stench and unhygienic conditions, hindering studies. Despite complaints and protests, the municipality hasn't resolved the problem, impacting reading environment.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न