शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

...यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांना लागली जपानी भाषेची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:59 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत १७० कामगारांनी जपानी भाषेचे धडे गिरवले आहेत. 

ठळक मुद्दे‘डीएमआयसी’अंतर्गत शेंद्रा येथे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (आॅरिक) उभी राहते आहे. या सिटीकडे जपानी उद्योग आकर्षित होत आहेत.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : ‘डीएमआयसी’अंतर्गत शेंद्रा येथे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (आॅरिक) उभी राहते आहे. या सिटीकडे जपानी उद्योग आकर्षित होत आहेत. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादेत येणाऱ्या जपानी पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्या जपानी भाषेचा चांगलाच बोलबाला असून, जिल्ह्यातील कामगारांनाही जपानी भाषेची गोडी लागली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत १७० कामगारांनी जपानी भाषेचे धडे गिरवले आहेत. 

गेल्या काही वर्षांत जपान आणि भारतादरम्यान दिवसेंदिवस चांगले संबंध प्रस्थापित होत आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांमुळे जिल्ह्यात परदेशी पर्यटकांची कायम वर्दळ असते. दुसरीकडे भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वीच आॅरिक सिटी प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपान आणि कोरियन कंपनीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली होती. २० जून रोजी दिल्लीमध्येही ‘आॅरिक ’विषयी जपानी कंपन्यांना सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे जपानी भाषेबद्दल जागरूकता वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांना उद्योग क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने चार वर्षांपूर्वी विदेशी भाषेच्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून पाऊल टाकले होते. 

यामध्ये कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी जपानी भाषेचे वर्ग घेण्यात येतात. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. सुरुवातीला प्रतिसाद किती मिळेल, याविषयी शंका होती; परंतु आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. बजाजनगर, सिडको, शिवाजीनगर येथे कामगार प्रशिक्षण वर्गात ही भाषा शिकवली जाते. गेल्या चार वर्षांत ६५० जणांनी या जपानी भाषेचे शिक्षण घेतले. यामध्ये १७० कामगार, तर ४८० कामगार पाल्यांच्या समावेश होता, अशी माहिती प्रशिक्षक आनंद गवई यांनी दिली. जपानी भाषा आत्मसात केल्यानंतर दुभाषक, गाईडसह उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध होतात. कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी नाममात्र फी आकारून हे वर्ग घेतले जात आहेत.

औद्योगिक क्षेत्रात वाढऔरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसी, आॅरिक सिटीच्या माध्यमातून झपाट्याने वाढ होत आहे. कामगार आणि कामगार पाल्य जपानी भाषा शिकण्यास प्राधान्य देत आहेत. प्रशिक्षण वर्गास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात ३२ कामगारांनी प्रशिक्षण घेतले.- भालचंद्र जगदाळे, सहायक कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

यशस्वी वाटचालजपानी भाषा शिकण्याकडे कल वाढत आहे. कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या वर्गात जपानी भाषा शिकून अनेकांनी विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल केली आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पातळीवर चांगला अभ्यास करून या भाषेत अधिक निपुणता मिळविता येते.- आनंद गवई, जपानी भाषा प्रशिक्षक

टॅग्स :Shendra MIDCशेंद्रा एमआयडीसीJapanजपानEmployeeकर्मचारी