शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

'मोदीजींच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेचे दडपण कमी झाले, स्फूर्ती मिळाली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:20 IST

परीक्षा पे चर्चा या उपक्रमात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला.

फुलंब्री : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेचे दडपण कमी झाले असून स्फूर्ती मिळाल्याचे सांगितले. 

परीक्षा पे चर्चा या उपक्रमात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. राजकीय, अभ्यासाचा तणाव, परीक्षेतील कॉपी अशा  विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी दिली. वेळेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आले नाहीत. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठी स्क्रीन लावून हा कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आला. येथे शहरातील पाच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, मुख्याध्यापक जगदीश सोनवणे, पर्यवेक्षक  गोविंद पायघन, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, अनुराधा चव्हाण, सर्जेराव मेटे, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर, राम बनसोड, बाळासाहेब तांदळे, वाल्मिक जाधव, सुचित बोरसे, सुमित प्रधान यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. 

कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते एका विद्यार्थ्याने परीक्षेत अनेकजण कॉपी करून पास होतात अशी चिंता व्यक्त केली. यावर मोदी यांनी कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत दुजोरा दिला. तसेच एका प्रश्नांचे उत्तर देताना मोदी यांनी मी विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही. पण टीकेचा विचार करतो, त्यातून बदल घडवतो असे म्हटले. 

स्फूर्ती मिळाली पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी परीक्षेला सामोरे जाताना तणाव हाताळण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे मला स्फूर्ती मिळाली आहे. त्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या काळातील परीक्षेला सामोरे जाणार.- जयराज भागीनाथ शेवाळे, विद्यार्थी 

दडपण कमी झालेबोर्डाची परीक्षाजवळ आली आता न घाबरता तिला सामोरे जायचे. जी गोष्ट मनापासून कराल ती सोपी होते. आपल्या मनाला जे आवडत ते करायला हवे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन भावले. माझ्या मनावरील दडपण कमी झालेले - अनुजा प्रवीण साळवे, विद्यार्थिनी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण