तांत्रिक अडचणीमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:06 IST2020-11-27T19:06:03+5:302020-11-27T19:06:48+5:30
हैदराबादला जाणारे प्रवासी विमानतळावर सुमारे साडेतीन तास ताटकळले होते.

तांत्रिक अडचणीमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत
औरंगाबाद : तांत्रिक अडचणीमुळे औरंगाबादला येणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी अर्ध्या प्रवासातून हैदराबादला परतले. हे विमान पुन्हा सायंकाळी
औरंगाबादेत आले.
हे विमान औरंगाबादला दुपारी दीड वाजेच्या सुमारास येणार होते. नियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण घेतले. परंतु औरंगाबाद काही अंतरावर असतानाच विमान पुन्हा हैदराबादकडे नेण्यात आले. औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर प्रवासी थांबले होते. हे विमान पुन्हा सायंकाळी साडेपाचला औरंगाबाद विमानतळावर उतरले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. या सगळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचबरोबर हैदराबादला जाणारे प्रवासी विमानतळावर सुमारे साडेतीन तास ताटकळले होते.