पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: August 21, 2014 01:19 IST2014-08-21T00:49:43+5:302014-08-21T01:19:46+5:30

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून,

Due to the spread of drought | पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट

पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट



नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्यापही बैलांसाठी लागणारे साज, सुताच्या दोरीची खरेदी झालेली नाही. त्यामुळे पोळा कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे.
नळणी व परिसरात भर पावसाळ्यात आलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, मिरची लागवड केली. परंतु त्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यातही उत्पादनाची घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊसच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच शेतकऱ्याचां मोठा सण म्हणून पोळ्याला महत्त्व आहे.
त्यामळे बैलांसाठी शहरात जावून घागरमाळ, बाशिंग, झाल आणतात परंतु यंदा सुताचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोळा सण हा आठ दिवसांवर आला आहे. तरी बाजारपेठेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच पोळा सणावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोळासणासाइी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूत थोडीफार वाढ झालेली आहे. मात्र आधिच दुष्काळ असल्याने शेतकरी फारसे साहित्य खरेदी करताना दिसून येत नाही.
पावसाची प्रतीक्षाच
जालना जिल्ह्यातमागील तीन वर्षापासून निर्सगाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला होता. १२ आॅगस्टअखेर वार्षिक टक्केवारीच्या ७३. ३३ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी मात्र आज पर्यंत केवळ १७.५९ टक्के पाऊस झालेला आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा चार पटीने कमी पाऊस झालेला आहे. जिल्हा भरातील शेतकरी अद्यापही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the spread of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.