पाणी सोडण्याच्या कारणावरून ग्रा.पं. कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:03 IST2021-07-10T04:03:57+5:302021-07-10T04:03:57+5:30

देवगाव रंगारी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांस पाणी का सोडले नाही, असे म्हणून एका ग्रामपंचायत सदस्याने मारहाण करून डोके फोडले. ही ...

Due to release of water, G.P. Beating an employee | पाणी सोडण्याच्या कारणावरून ग्रा.पं. कर्मचाऱ्याला मारहाण

पाणी सोडण्याच्या कारणावरून ग्रा.पं. कर्मचाऱ्याला मारहाण

देवगाव रंगारी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांस पाणी का सोडले नाही, असे म्हणून एका ग्रामपंचायत सदस्याने मारहाण करून डोके फोडले. ही घटना शुक्रवारी रुईखेडा येथे घडली. अशोक उत्तम पुणेकर (५५) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रुईखेडा येथील ग्रा.पं. कर्मचारी अशोक पुणेकर हे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता ग्रामपंचायतजवळ उभे होते. तेव्हा तेथे ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण धोंडिबा सुसलादे आले. आमच्याकडे पाणी का सोडले नाही, असे म्हणून त्यांनी पुणेकर यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. यात पुणेकर यांचे डोके फुटले आहे. याप्रकरणी सुसलादे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विनोद तांगडे करीत आहेत.

090721\1643-img-20210709-wa0021.jpg~090721\img-20210709-wa0026.jpg

रुईखेडा येथील कर्मचारीला पाणी न सोडल्यावरून सदस्याची मारहान~रुईखेडा येथील कर्मचारीला पाणी न सोडल्यावरून सदस्याची मारहान

Web Title: Due to release of water, G.P. Beating an employee