खड्ड्यांमुळे बसमध्येच झाली महिलेची प्रसूती

By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:38:10+5:302014-12-25T00:47:16+5:30

सोयगाव : तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रसूती बसमध्येच झाली. सोयगाव-मालेगाव बसमध्ये किन्ही गावाजवळ ही घटना घडली.

Due to the potholes, the delivery of woman in the bus | खड्ड्यांमुळे बसमध्येच झाली महिलेची प्रसूती

खड्ड्यांमुळे बसमध्येच झाली महिलेची प्रसूती

सोयगाव : तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रसूती बसमध्येच झाली. सोयगाव-मालेगाव बसमध्ये किन्ही गावाजवळ ही घटना घडली. गर्भवती महिलेवर ओढावलेल्या प्रसंगात बसचे चालक-वाहक यांच्या सावधगिरीने व इतर महिला प्रवाशांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे बाळ व बाळंतीण सुखरूप आहे.
सोयगाव तालुक्यातील नांदगाव शिवारात एका वीटभट्टीवर काम करणारी सरलाबाई रोहिदास राठोड (वय ३५) ही गर्भवती महिला चाळीसगावला जाण्यासाठी सोयगाव-मालेगाव बसमध्ये बसली. तिला किन्ही गावाजवळच प्रसूती वेदना सुरू झाल्या. बसचालक नरेश पाटील व वाहक बशीर तडवी यांनी पुरुष प्रवाशांना खाली उतरविले. तोपर्यंत महिला बेशुद्ध पडलेली होती. महिला प्रवाशांना घेऊन बस किन्ही गावात आणली. किन्ही गावच्या सरपंच शोभाबाई शेळके, वंदना फलके, कलाबाई लोखंडे, खाजगी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, उपसरपंच नवनाथ जाधव यांनी तात्काळ प्रसूतीची तयारी केली. किन्ही गावातील महिलांनी त्या महिलेला धीर दिला. महिलेची सुखरूप प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला बसमध्येच जन्म दिला. या बसच्या चालक आणि वाहकांनी केलेल्या सहकार्यामुळे महिला व तिचे मूल सुखरूप वाचले. यामुळे दोन्ही चालक, वाहकाचा गौरव करणार असल्याचे आगार प्रमुख सुभाष भापकर यांनी सांगितले, तर प्रसूतीनंतर महिला व बाळाला किन्ही गावातील ग्रामस्थांनी चांदे (जि.धुळे) येथे रवाना केले.

Web Title: Due to the potholes, the delivery of woman in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.