शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 12:03 PM

देसी जुगाडकरून स्वत:ची गिरणी, स्वत:ची हळद, दळून देतो डोळ्यासमोर

ठळक मुद्देशुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत मिळवले उत्पन्न वाशिमच्या शेतकऱ्याचा औरंगाबादेत फिरता कृषी प्रक्रिया उद्योगधडपड्या शेतकऱ्याने केली तोट्यावर मात;

औरंगाबाद : बाजारात कृषी माल विकताना होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे कंटाळलेल्या वाशिमच्या शेतकऱ्याने ( Farmer ) मोठ्या हिकमतीने त्यावर उपाय शोधला आहे. या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात पिकवलेली हळद, स्वत:च्या फिरत्या गिरणीवरून ग्राहकांच्या घरोघरी जाऊन दळून देण्याचा कृषी प्रक्रिया उद्योग (Agriculture Processing Unit )  सुरू केला आहे. गेल्या महिनाभरापासून हा शेतकरीऔरंगाबादेतील गल्लोगल्ली फिरून ग्राहकांना विनाभेसळ दळलेली हळद विकतो आहे.

शिवाजी दशरथ कुऱ्हे (रा. एकअंबा, जि. वाशिम) असे या धडपड्या शेतकऱ्याचे नाव. सिडको एन-४ परिसरात रस्त्यावर धडधडणारी गिरणी पाहून कुणालाही कुतूहल वाटेल. कुऱ्हे म्हणाले, मला सव्वादोन एकर शेती आहे. मी पत्नी व दोन मुले शेतीत राबतो. हळदीसारखे नगदी पीक घेऊनही हाती काहीच उतरत नसल्याने हा उद्योग केला. चारचाकी गाडी तयार करून त्यावर डिझेल इंजिनने ही चक्की फिरवतो. गल्लोगल्ली जाऊन लोकांना शुद्ध हळद दळून देतो. गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मी अमरावतीत हळद दळून विकली. आता नफा दिसतोय. केलेल्या कष्टाचे चीज होतेय.

औरंगाबाद मोठे शहर असल्याने महिन्याभरापूर्वी ही गाडी घेऊन येथे आलो. रस्त्यावर उभे राहून हळद दळून देत होतो. डॉ. बाविस्कर यांना हळद दळून दिली. त्यांनी माझी सहज विचारपूस केली. माझे कष्ट पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला रात्रभर थांबण्यास मोफत रूम दिलीय. मी वाशिमहून हळद लक्झरी बसने मागवतोय.

ग्राहकांना स्वस्त व भेसळमुक्त हळदबाजारात हळद पावडरची किंमत २०० ते २४० रुपये किलो आहे. ती हळद भेसळयुक्त असू शकते. माझ्या गाडीवरून लोक हळद खरेदी करतात. मी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना दळून देतो. ही हळद शंभर टक्के शुद्ध आहे. शिवाय मी ती केवळ १६० रुपये किलोने विकतो. दिवसभरात ४० ते ५० किलो हळद मी सध्या औरंगाबादेत विकतो.

असे हे देशी जुगाडचारचाकी फॅब्रिकेटेड गाडीवर जनरेटर बसवून छोटी गिरणी बसविली आहे. ही चारचाकी चक्क दुचाकीला जोडून ओढली जाते. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी गाडी उभी करून हळद दळली जाते. दुसऱ्या दिवशी स्थळ बदलले जाते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेती