निधीअभावी ६१ गावांना स्वच्छता मोहिमेतून वगळले
By Admin | Updated: December 14, 2015 23:55 IST2015-12-14T23:52:49+5:302015-12-14T23:55:20+5:30
लातूर : पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १८३ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यापैकी फक्त २१ गावामध्ये १०० टक्के शौचालय उभारणी करण्यात आली़

निधीअभावी ६१ गावांना स्वच्छता मोहिमेतून वगळले
लातूर : पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १८३ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यापैकी फक्त २१ गावामध्ये १०० टक्के शौचालय उभारणी करण्यात आली़ उर्वरित गावातही कामे सुरु आहेत़ परंतु, बजेटअभावी ६१ गावांना हागणदारीमुक्तीच्या मोहिमेतून वगळले आहे.
वार्षिक कृती आराखड्यांतर्गत हागणदारीमुक्त गाव मोहिमेसाठी १८३ गावांची निवड २०१५-१६ साठी करण्यात आली़ यामध्ये अहमदपूर तालुक्यात ३०, औसा २४, चाकूर १४, देवणी १२, जळकोट ११, लातूर ३५, निलंगा २५, रेणापूर १४,शिरुर अनंतपाळ ७, उदगीर ११ अशा एकूण १८३ गावांचा समावेश आहे़ पहिल्या टप्प्यात २१ ग्रामपंचायती १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्या आहेत़ यामध्ये निलंगा तालुक्यातील आंबेगाव, जाऊ, रामतिर्थ, रेणापूर तालुक्यातील कुंभारवाडी, लातूर तालुक्यातील धानोरी, देवणी तालुक्यातील गुरधाळ, सावरगाव, वागदरी, आंबेगाव, तळेगाव, जळकोट तालुक्यातील पाटोदा (खु़), करंजी, अहमदपूर तालुक्यातील धानोरा (खु़), कौळवाडी, मावलगाव, मेथी, औसा तालुक्यातील लोहटा, चाकूर तालुक्यातील नांदगाव, मुरंबी, उदगीर तालुक्यातील आवलकोंडा, लोणी आदी गावांचा समावेश आहे़ उर्वरीत गावातीलही ७०-८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत़ तर २० ग्रामपंचायती अंतर्गत शौच्छालयाची कामे जानेवारीमध्ये पूर्ण होणार आहेत़