जायकवाडी धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:02 IST2018-07-07T00:01:41+5:302018-07-07T00:02:44+5:30
जायकवाडी धरणाच्या जलाशयात शहरातील नारळा भागात राहणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

जायकवाडी धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात शहरातील नारळा भागात राहणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी
उघडकीस आली.
गुरूवारी दुपारी शाळेत जातो असे घरी सांगून निघालेल्या १२ वर्षीय विद्यार्थी कृष्णा बिडवे याचा मृतदेह जायकवाडी धरणाच्या जलाशयात मिळून आला. शाळेत जातो असे सांगून गेलेला कृष्णा जायकवाडी धरणावर का गेला व पुढील घटनांचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. कृष्णा पाण्यात बुडाला असावा असा अंदाज घेऊन शुक्रवारी सकाळी १० वाजता न.प.च्या अग्निशमन दलाने पाण्यात शोधमोहीम सुरू केली. अग्निशमनचे निरीक्षक खलील धांडे व त्यांच्या पथकाने नाथ सागरात ज्या ठिकाणी कृष्णाचे शाळेचे साहित्य भेटले, त्या ठिकाणच्या पाण्यात शोध घेतला असता सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृष्णाचा मृतदेह हाती लागला. कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पोलिसांनी दाखल केला आहे.