शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

मो़या़शेख, वस्सा दरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे,

मो़या़शेख, वस्सादरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे, तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या छळा बसत आहेत़ दुष्काळाच्या सावटातच नागपंचमी सणाच्या झोक्यावर उदासिनतेची छाया पसरली आहे. हा सण साजरा करण्याचे आवसान बळीराजात उरलेले नाही. जिल्ह्यात पावसाचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे ठाक गेले आहेत. मोठा पाऊस कुठेच झालेला नाही. हलक्या पावसावरच शेतकऱ्यांनी कशीबशी खरीपाची पेरणी पूर्ण केली खरी परंतु, ही पिके धोक्यात आली आहेत. १ आॅगस्ट रोजी नागपंचमी हा सण शहर व ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी सणासाठी सासरी गेलेल्या नवविवाहित मुलींना माहेरी आणण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे; परंतु शेतकऱ्यांनी अल्पश: पावसावर धूळ पेरणी केली होती. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके हातची गेली. त्यानंतर उसनवारी व कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तिही वाया गेली. अशा परिस्थितीत नागपंचमीचा सण कसा साजरा करावा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. पंचमीचा झोका पावसाने ओलाचिंब व्हावा, अशी प्रतीक्षा लागली आहे़ गतवर्षी शेती होती हिरवीगारगेल्या वर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती हिरवीगार होती. त्यामुळे जिल्ह्यातील नवविवाहित मुलींना नागपंचमी सणानिमित्त माहेरी आणले होते़ यंदा मात्र बळीराजा चारही बाजुंनी अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे यंदा नागपंचमीचा सण साजरा करणाऱ्यावर दुष्काळाचे विरजन पडले आहे़ नागपंचमी म्हटले की नवविवाहित मुलीच्या आनंदाला पारावारच उरत नाही़ परंतु, यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे़ यामुळे नागपंचमीच्या दिवशी नवविवाहित मुलीचे वडील अथवा भाऊ तिला माहेरी आणण्यासाठी जातात़ परंतु, यंदा अशी परिस्थिती दिसून येत नाही़ ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही सण साजरा करण्यासाठी गावाकडे जाणे टाळले आहे़